मुंबई,(विश्वासराव आरोटे) – संपूर्ण राज्यभरात कोरोणाने थैमान घातले असून जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये कडक नियम लावले जातात मात्र पंढरपूर , मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांची आखाडी मोठ्या प्रमाणात पडत असून याकडे सरकारचे लक्ष का जात नाही तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची सभा या मतदारसंघात सुरू असताना पावसाने वेग घेतला तरी सातारा पॅटर्न पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पहावयास मिळाला.
याठिकाणी भर पावसामध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृह पुन्हा एकदा भाजपाच्या अधिकृत उमेदवाराला विजयी करण्याचे आव्हान केले भर पावसात ही सभा संपूर्ण सोशल मीडियावर गाजली मात्र यामध्ये ज्या नागरिकांच्या अंगावर पावसाचे पाणी बरसले त्यातील 70 ते 80 टक्के लोकांना नक्कीच कोरोनाची लागण होऊ शकते असा तज्ञांचे मत आहे.
म्हणून या सरकारनं ‘आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्र्ट अशी भूमिका घेतल्याची म्हणण्याची वेळ नागरिकांना येऊ लागले आहे गरिबांसाठी लॉक डाऊन तर नेत्यांसाठी हा नियम लागू होत नाही का असा संतप्त सवाल आता राज्यातील व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून आता व्यक्त होऊ लागला आहे.
कडक निर्बंध लावत या आजाराची साखळी तोडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा जोरदार तयारी करताना दिसतात अनेकांना हातावर पोट भरण्यासाठी सुरू असलेली मोलमजुरी तर दुसरीकडे व्यापारी वर्गाला आपली दुकाने बंद करून घरामध्ये थांबावे लागते तर दुसरीकडे मात्र ज्या राजकीय नेत्यांनी हा लोक डाऊन जाहीर केला त्यांनीच मात्र या आदेशाचे उल्लंघन केले असून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील महा विकास आघाडी विरुद्ध भाजपा या नेत्यांच्या सभा लाखोंच्या गर्दीने होत आहेत.
महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशवासीयांची आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर देखील बंद करण्यात आले याठिकाणी भावी भक्तांना देखील दर्शनासाठी दर्शन बंद करण्यात आली मग राजकीय नेत्यांना कोणता नियम लावण्यात आला राजकीय नेते फक्त गोरगरिबांवर नियम लावणार त्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचे काम महाविकास आघाडी सरकार व विरोधी पक्षांकडून होते काय असा संतप्त सवाल या भागातील व्यापारी वर्गाकडून होत आहे.
निवडणूका ांबणीवर ठेवण्यासाठी सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर बंदी घालण्यात आली मात्र दुसरीकडे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांचे मातब्बर नेते या मतदारसंघात तळ ठोकून असून कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टेंस न पाळता या ठिकाणी राजकीय आखाड तयार झाला असून या ठिकाणी लाखोंची उपस्थिती दिसून येते या राजकीय नेत्यांवर सोलापूरचे जिल्हाधिकारी आता कारवाई करणार की नाही जो अधिकारी कारवाई करेल त्याची बदली गडचिरोलीला होईल या भीतीने कोणीही कारवाई करायला तयार नाही मग हा नियम राजकीय नेत्यांना का नको ज्यांनी नियमाची पायमल्ली घालून दिली त्यांनीच नियमाचे उल्लंघन केले अशा राजकीय नेत्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची साकळी तोडण्यासाठी नियम पाळावे अनावश्यक कोणीही घराबाहेर पडू नये सर्वांनी दुकाने बंद करावीत असे आव्हान करतात तर दुसरीकडे मात्र राजकीय सभांची तोबा गर्दी पाहायला मिळते.
या गर्दीवर कुणाचा अंकुश राहणार की नाही ज्या ज्या ठिकाणी राजकीय सभा संपन्न झाल्या त्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहता त्या त्या ठिकाणी त्या त्या नेत्यावर गुन्हा का दाखल होऊ नये आज परिस्थिती अशी आहे. ‘आई भीक मागू देईना बाप पोट भरू देईना’ कशी निर्माण झाली तर राज्य सरकार लवकरच निर्बंध असल्याचे सांगत असले तरी अनेकांनी आता आपला प्रपंच बाहेर राज्यात नेण्यासाठी थवेच्या थवे आता रेल्वेस्थानकांवर तडकू लागले आहेत.
रात्रीच्यावेळी शहरात विनाकारण फिरणारे आणि मास न लावताच करणाऱ्या नागरिकांवर देखील आता प्रशासनाने कळक कारवाईचे संकेत दिले असून आत्तापर्यंत अनेकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आहे. रिकामटेकडे फिरणाऱ्या नागरिकांना जरब बसवण्यासाठी बेफिकीर करणाऱ्यांमध्ये आता खळबळ निर्माण झाली असून या कारवाईचे संपूर्ण भागातील नागरिकांनी स्वागत केले आहे. विशेष बाब म्हणजे रात्रीच्या वेळी व पहाटे व्यायामासाठी घराबाहेर पडतात त्यावेळी त्यांचे थवेच्या थवे दिसून येतात त्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होत असली तरी कोणालाही ते सांगत नाही.
त्यामुळे याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात अनेकांना होताना दिसत आहे ज्याच्या ठिकाणी सकाळी मॉर्निगवॉक व रात्री जेवणानंतर फिरताना दिसतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून देखील प्रशासनाची कोणी ऐकण्यास तयार नाही यामध्ये अनेक राजकीय नेत्यांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येतो राज्य शासनाने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा देखील पुढे टाकले असून एमपीएससी यूपीएससी या परीक्षादेखील त्यांनी मे जुन दरम्यान घेण्याचे आदेश नुकतेच जारी केले आहेत.
उलट शासन व राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लोकांनी लॉकडाऊन बाबत मानसिकता ठेवा असा संदेश नववर्षाच्या पुर्व संध्येला जनतेला दिला आहे लोकांसाठी मानसिकता तयार ठेवा तयारीसाठी पूर्ण वेळ मिळेल महाराष्ट्राला दररोज सहा लाख लसीची पूर्तता झाल्यावर राज्याचा वेग वाढवता येईल प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सीजन प्लांट तातडीने उभारणे वाटपाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देणे प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगतात.
मात्र राजकीय सभा ज्या ठिकाणी घेतल्या जातात त्या ठिकाणच्या गर्दीचा उच्चांक पाहिला तर त्या ठिकाणी देखील कोरोना मोठ्या प्रमाणात हो पाहू शकतो हे या राजकीय नेत्यांना अद्यापही का जाणवत नाही गोरगरिबांच्या लग्नासाठी देखील आता शासन परवानगी देत नाही मग राजकीय आखाड्यात परवानगी का असा संतप्त सवाल देखील होऊ लागला आहे.
तर दुसरी बाब अशी की जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी हरिद्वार मधील कुंभमेळ्यासाठी भक्तांनी रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती एकीकडे कोरोना चा कहर वाढत असताना दुसरीकडे या वेळी लोकांकडून करूनच या नियमांची जाहीरपणे उल्लंघन करण्यात आले होते मास्क तसेच सोशल गोष्टींचे पालन या वेळी करण्यात आले नाही.
गंगा नदी स्नान करण्यासाठी पवित्र दिवस मानल्या जाणाऱ्या शाही स्नानाच्या एक दिवस आधी लाखोंच्या संख्येने भक्तांनी नदीकिनारी गर्दी केली होती आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमांची जाहीरपणे याठिकाणी उल्लंघन करण्यात आली अनेक भाविकांनी या वेळी हरिद्वार आला येताना निगेटिव रिपोर्ट सादर करण्याचे सरकारने जारी केले असल्याने कोरोना हा चिंतेचा विषय नसल्याचा दावा करण्यात येतो.
बारा वर्षातून एकदा येणारा कुंभमेळा सध्या करूनच या संकटात पार पडत आहे देशात कोरूना ची दुसरी लाट आलेली असून गेल्या चोवीस तासात तीन लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहे कुंभमेळ्यासाठी सर्व नियमांचे पालन केले जाईल असे सांगितले असले तरी अनेक तज्ज्ञांनी देखील या ठिकाणी गर्दी करु नये असे सांगितल.
अनेक गाईडन्स देण्यात आल्या तरी त्याचे कुठेही पालन करण्यात आलेले नाही हरिद्वारमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये 687 पूर्ण रुग्ण आढळले आहेत शहरात सध्या व ग्रामीण भागात देखील रुग्णांची भर मोठ्या प्रमाणात होत असून शासनाने जनतेला केलेले आव्हान हे जरी जनतेसाठी मानत असले तरी राजकीय नेते स्वार्थापोटी कोणतेही नियम पाळत नाही अशा स्वार्थी नेत्यांवर गुन्हा दाखल होऊ नये पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील ज्या राजकीय नेत्यांनी सभा गाजवल्या त्या त्या सभेचे व्हिडीओ ओपन करून त्या त्या ठिकाणी लाखो लोकांची असलेली गर्दी लक्षात घेऊन त्या राजकीय नेत्या वरच उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी पुढे येऊन गुन्हे दाखल करावेत.
महाराष्ट्रातील मग आम्ही काय पाकिस्तानमधील आहोत का असा देखील संतप्त सवाल या राजकीय नेत्यांकडून व्यक्त होऊ लागला आहे नियमांचे उल्लंघन करणे नियमांची अंमलबजावणी करणारे सरकारच नियमांची पायमल्ली करत आहे.त्यामुळे अधिकारी वर्गाने देखील यावर अंकुश बसवणे ही काळाची गरज असते याची देखील चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
पत्रकार – विश्वासराव आरोटे