मुंबई,(प्रतिनिधी) – राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाची साखळी ब्रेक करायची असेल तर
तर थोडी ‘कळ’ काढावीच लागेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं असून राज्यात कडक निर्बंध व लॉकडाऊन निश्चित होईल असे संकेत दिले आहे.
एका बाजूला जनभावना, तर दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक. अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावीच लागेल. जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जो काही निर्णय घेतला जाईल त्याला सर्वपक्षीय नेत्यांनी सहकार्य द्यावे असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
आज टाक्स फोर्स सोबत बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सर्वपक्षीय बैठक बोलावून राज्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती मांडून लॉकडाऊन आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. मात्र ‘टास्क फोर्स’ च्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात येईल असं जाहीर केलं होतं त्यानुसार आज लॉकडाऊन की कठोर निर्बंध यावर फैसला होण्याची शक्यता आहे.