संपूर्ण राज्यात कोरोना (corona) संसर्ग झपाट्याने वाढत चालला असून राज्यातील आरोग्य यंत्रनेची पुरती तारांबळ उडाली आहे. रुग्ण संख्या एवढी आहे की आरोग्य सुविधा उणीव भासत आहे. त्यामुळं कोरोनाशी दोन हात लढण्यासाठी नागरिकांना काही नियम पाळावे लागतील हे सांगण्याची आता गरज राहिलेली नाही.
कोरोनापासून सुरक्षित राहण्याची ही ‘पाच मूलभूत तत्वे’ महाराष्ट्र पोलीस (maharashtra police)विभागानं ट्विट करून जाहीर केले आहे. आणि ते मूलभूत तत्व तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर जाणून घेऊया ते मूलभूत तत्व :-
१)मास्क
२)अंतर
३)हाताची स्वच्छता
४)लोकडाऊनची वेळ
५)लस
सध्याच्या दैनंदिन जीवनात जर या पाच मूलभूत तत्वाचा काळजी पूर्वक वापर केल्यास तुम्ही स्वतःला व इतरांनाही सुरक्षित ठेऊ शकतात.