मुंबई, (प्रतिनिधी)- राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे पुन्हा एकदा कडक लाॅकडाऊन लागण्याची चिन्हे दिसत आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक आज ५ वाजता सुरु झाली आहे.
व्हिडीओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित असून वाढत्या रुग्ण संख्या लक्षात घेता लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याचं मत मुख्यमंत्री यांनी मांडलं असल्याचं कळतं तर लॉकडाउनला विरोधी पक्षाने विरोध दर्शविल्याचे समजते.
सदर बैठकित राज्यात लॉकडाऊन लागणार की कठोर निर्बंध यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.