अहमदाबाद – संपूर्ण देशात करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं सर्वत्र चिंतेचं वातावरण दिसून येत असून अनेक राज्यांत पुन्हा एकदा लॉकडाऊन, विकेन्ड कर्फ्यू ची पुन्हा एकदा आवशकता दिसून येत आहे.
दरम्यान गुजरात उच्च न्यायालयानं देखील याबाबत अशा उपाययोजना आवश्यक असल्या बाबत मत नोंदविले आहे.भाजप शासित गुजरातमध्ये वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाकडून लॉकडाऊन लावण्याची गरज व्यक्त केली आहे.महाराष्ट्रातील निर्बंधवर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस विरोध दर्शवीत असतांना भाजपा शासित आता ‘महाराष्ट्र मॉडेल’ राबविल्या जाण्याच्या तयारीने फडणवीस अडचणीत सापडले आहे.
गुजरात उच्च न्यायालयात कोरोना संकटासंबंधी एक याचिका दाखल करण्यात आली होती. यावर, राज्यात करोना संकट रोखण्यासाठी लॉकडाऊन लावणं गरजेचं आहे, असं म्हणत उच्च न्यायालयानं ढिम्म राज्य सरकारला चपराक लावली आहे.
राज्यात तीन – चार दिवसांचा किंवा विकेन्ड कर्फ्यू लावण्याची गरज असल्याचं गुजरात उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. राज्यात करोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक असल्याचं आणि त्यासंबंधी राज्य सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देशही उच्च न्यायालयानं दिले आहे.