भारतीय हवाई दलाच्या ग्रुप ‘सी’ च्या सिव्हीलीयन रिक्त पदांची भरती होतं असून दहावी, बारावी, पदवी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइट indianairforce.nic.in वर भेट देऊन अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ मे २०२१ आहे.
भरतीमध्ये स्टेनोग्रफर, सीनियर कंप्यूटर ऑपरेटर, कुक, हाउस कीपिंग स्टाफ, MTS, LDC, CS & SMW, Supdt (Store), कारपेंटर, लॉन्ड्रीमॅन, हिंदी टाइपिस्ट सारख्या एकूण १५२४ जागा भरल्या जाणार आहेत. भरतीची नोटिफिकेशन आणि ऍप्लीकेशन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी IAFच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
रिक्त पदे
वेस्टर्न एयर कमांड यूनिट – ३६२ पद
साउदर्न एयर कमांड यूनिट – २८
ईस्टर्न एयर कमांड यूनिट – १३२
सेंट्रल एयर कमांड यूनिट – ११६
मॅन्टेनन्स कमांड यूनिट – ४७९
ट्रेनिंग कमांड यूनिट – ४०७
सिव्हीलीयन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, कुक, पेंटर या पदांसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. तर लोअर डिव्हिजन लिपिक (LDC), स्टेनोग्राफर, हिंदी टायपिस्ट आणि स्टोअर कीपर या पदांसाठी १२ वी पास असलेले उमेदवार तर, कंप्यूटर ऑपरेटर आणि स्टोर या पदासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात.
सर्व पदां करिता किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्षे आहे. तसेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे, अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना 5 वर्षे आणि अपंग उमेदवारांना जास्तीत जास्त 10 वर्षे वयाची मुदत वाढ दिली आहे.