मुंबई – एपिआय सचिन वझे यांनी शिवसेनेचे नेते, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप करणारे पत्र समोर आल्याने आघाडी सरकार करिता हा दुसरा ‘लेटर बॉम्ब’ मानला जात आहे, असं असलं तरी महाविकास आघाडीचे भक्कम पणे बाजू मांडणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून सचिन वाझेंच्या त्या ‘लेटर बॉम्ब’ वर प्रश्न उपस्थित केले असून हा सगळा प्रकार घडवीणारे इतिहासातील सगळ्यात मोठे ‘साडेतीन’ अती शहाणे कोण?असा प्रश्न समोर आला आहे.
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की,जेल मधील पत्रलेखन हा संशोधनाचा तितकाच अभ्यासाचा विषय आहे. असे काही पत्रलेखक इतरांना देखील मिळू शकतात.
एकंदरीत सर्व स्तरावर गलिच्छ राजकारणाने टोक गाठले आहे. महाराष्ट्राची प्रतिमा कलंकीत करण्याचे इतिहासातील हे सगळ्यात मोठे साडेतीन अती शहाण्यांचे कारस्थान दिसतेय.
जय महाराष्ट्र… यावरून हे ‘साडेतीन शहाणे’ कोण असा प्रश्न समोर आला आहे.