चाळीसगाव,(प्रतिनिधी)मिनी लॉकडाऊन मुळे लहान मोठे व्यापारी, कामगार, उद्योजक संकटात आले आहेत. व्यापार करतांना घेतलेले कर्ज डोक्यावर असून कामगार देखील आर्थिक संकटात आहेत. आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहाची चिंता सर्वसामान्य जनतेला असताना शासनाने लॉक डाऊन घोषित केल्याने जनता हवालदिल झाली आहे. आधीच शनिवारी आणि रविवारी केलेल्या मिनी लॉकडाऊनला व्यापारी जनता यांचा पाठींबा आहे.
मात्र मिनी लॉकडाऊनला व्यापारी जनता कष्टकरी कामगार यांचा स्पष्ट विरोध असून कुठल्याही परिस्थितीत या निर्णयावर शासनाने फेरविचार करावा अन्यथा व्यापाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी शासनाला दिला आहे.
आज कापड, सराफ, रेडिमेड कपडे, ऑटोमोबाईल, वाहन दुरूस्ती गॅरेज हार्डवेअर सिमेंट स्टील व्यापारी, बुट चप्पल, इलेक्ट्रिक जनरल स्टोअर्स व्यापारी तसेच विविध आस्थापना मधील कामगार आदींनी आज खासदार उन्मेश दादा पाटील यांची जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली.
याप्रसंगी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, शहर पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड ,नगरसेवक नितीन पाटील,कापड उद्योग व्यावसायिक तथा जिल्हा बँकेचे माजी संचालक राजूभाऊ राठोड,सुरेश तलरेजा ,चेतन पंजाबी, दिलीप मेहता, राजूभाऊ मुंदडा, गौरव कलंत्री, गणेश बागड, सराफ व्यावसायिक निलेश सराफ, हितेश जैन, विजय बाविस्कर, चेतन जैन, संतोष फडतरे, अमोल विसपुते आटोमोबाईल व्यवसायिक खुशाल पाटील, पवन जैन, पप्पू पाटील, अतिश कोठारी, वाहन दुरुस्ती कारागीर जोशी दादा, छोटू पाटील, सिमेंट हार्डवेअर व्यावसायिक विवेक येवले, शिखर निकम, अमित सुराणा, जयेश पटेल, हार्दिक पटेल, मोबाइल व्यवसाय सुरेश मदानी ,इलेक्ट्रिक व्यापारी दिनेश माधव शाह, कामगार योगेश पांडे, अमीत जगताप, वंदना जाधव, कल्पना नानकर, चेतन पाटील, मनोज नांदणकर, वैभव यादव, विठ्ठल यादव, संजय देशमुख, अजय शिंदे, देवीदास भंडारी, सागर पाटील, भूषण देशमुख सामाजिक कार्यकर्ते नरेन काका जैन, शेषराव चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यापाऱ्यांचे म्हणणे लागलीच फोन करून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेशी बोलून लॉकडाऊन बाबत फेरविचार करावा अशी मागणी केली.