जळगाव,दि. 7 – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 95 हजार 958 कोरोना बाधीत रुग्णांपैकी 82 हजार 600 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 11 हजार 646 रुग्णांवर उपचार सुरु असून 1 हजार 712 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
तालुकानिहाय उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण
सध्या जळगाव शहरात 2507, जळगाव ग्रामीणमध्ये 376, भुसावळ 1000, अमळनेर 834, चोपडा 2560, पाचोरा 350, भडगाव 425, धणगाव 504, यावल 469, एरंडोल 403, जामनेर 471, रावेर 390, पारोळा 238, चाळीसगाव 474, मुक्ताईनगर 308, बोदवड 265, इतर जिल्ह्यातील 72 असे एकूण 11 हजार 646 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे.
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 11 हजार 646 रुग्णांपैकी 9 हजार 25 रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. तर 2 हजार 621 रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत. बाधित असलेल्या रुग्णांपैकी 7 हजार 796 रुग्ण हे गृह अलगीकरणात असून 520 रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहे. तर कोविड केअर सेंटर मध्ये 1229, डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटर मध्ये 1793 तर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 828 रुग्ण उपचार घेत आहेत. उपचार सुरु असलेल्या रुग्णांपैकी 1312 रुग्णांना ऑक्सिजन वायू सुरु असून 557 रुग्ण आयसीयूमध्ये दाखल असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
तालुकानिहाय मृत्यु संख्या
आतापर्यंत जळगाव शहरात 408, जळगाव ग्रामीणमध्ये 94, भुसावळ 249, अमळनेर 116, चोपडा 119, पाचोरा 81, भडगाव 50, धरणगाव 76, यावल 83, एरंडोल 60, जामनेर 86, रावेर 113, पारोळा 26, चाळीसगाव 87, मुक्ताईनगर 42, बोदवड 22 असे एकूण 1 हजार 712 बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
0000