मुंबई – कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता केंद्र सरकारनं नियम बदलवून वय अठरा वर्षावरील सर्वच नागरिकांना मोफत लस द्यावी अन्यथा येणारा काळ भीषण असेल असा सूचक इशारा महाराष्ट्र काँग्रेसनं आपल्या ऑफिशियल ट्विटर हॅण्डलवरून दिला आहे.
काँग्रेसनं ट्विट करून म्हटलं आहे की,कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढतोय परिणामी कोरोनाची दुसरी लाट उंबरठ्यावर उभी आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन झाला आहे आणि अनेक ठिकाणी होण्याच्या मार्गावर आहे. यावर उपाय फक्त एकच लसीकरण…
मोदी सरकारने तातडीने वयाची अट बदलून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करावे अन्यथा येणारा काळ भीषण असेल.
लॉकडाऊन किंवा निर्बंधांनी आपण कोरोनाचा प्रसार रोखू शकतो पण कोरोनाचा समुळ नायनाट करायचा असेल तर त्यावरील एकमेव उपाय म्हणजे सार्वत्रिक लसीकरण.
मोदी सरकारने तातडीने १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करावे अन्यथा वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यापलीकडे हाती काही उरणार नाही असं स्पष्ट केलं आहे.
देवेंद्र फडणवीसांना काँग्रेसचा टोला
काँग्रेसनं देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावात
फडणवीसांनी इतर देशांचे दाखले देत ज्ञान पाजळण्याचा प्रयत्न केला, पण ते करत असताना त्या देशात सुरु असलेल्या प्रभावी लसीकरणाबद्दल चकार शब्दही काढला नाही म्हणून काँग्रेसनं आश्चर्य व्यक्त केलं आहे.