जळगाव, (प्रतिनिधी)- विश्वातील सर्वात मोठ्या राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचा आज ४१ वा स्थापना दिवस संपूर्ण देशात साजरा होतं असतांना खासदार रक्षाताई खडसे यांनी देखील ‘भाजपा ध्वज फडकवत’ स्थापना दिवस साजरा केला आहे.
भाजपचा स्थापना दिन आज राज्यसह देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत असतांना खासदार रक्षाताई खडसे यांनी भा.ज.पा स्थापना दिनानिमित्त खासदार संपर्क कार्यालय मुक्ताईनगर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय व श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच खासदार संपर्क कार्यलाय मुक्ताईनगर येथे भाजपा ध्वजाचे रोपण केले. यानंतर समस्त भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
राज्यभर कार्यकर्ते पदाधिकारी यांनी दारासमोर कमळाची रांगोळी आणि घरावर पक्षाचा ध्वज उभारून भाजपचा ४१ वा स्थापना दिवस मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला.
६ एप्रिल १९८० ला भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची स्थापना झाली. स्थापना दिवसानिमित्त भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यामध्ये कोरोनाची नियमावली पाळून विविध सामाजिक उपक्रम राबवून स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील त्यांच्या निवासस्थानी पक्षाचा ध्वज व दारामध्ये रांगोळी काढण्यात आली. तर काही ठिकाणी बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांनी पक्षाचा ध्वज लावून मिठाई, साखर पेढे वाटून स्थपणा दिवस साजरा केला.