मुंबई, (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समजमाध्यमातून जनतेशी संवाद साधल्या नंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून आघाडी ‘सरकार’ वर जोरदार टीका करत ‘हल्लाबोल’ केला होता.दरम्यान आमदार रोहित पवार यांनी सरकारची पाठराखण करत ‘राज्यात राहून केंद्राशी ‘इमान’ राखणाऱ्यांना महाराष्ट्र पाहत आहे, पैसे ‘पीएम’ केअर फंडात देतात आणि ‘पॅकेज’ राज्य सरकार कडून करतात… असा टोला देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष करत म्हणाले होते की,पुन्हा लॉकडाऊन लावतांना युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही पॅकेज दिलंय…असं म्हणत राज्य सरकारनं देखील लॉकडाऊन करण्यापूर्वी जनतेला काही ‘पॅकेज’ जाहीर करावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती मात्र राष्ट्रवादीचे आमदार यांनी फडणवीस यांच्या अपेक्षाना चांगलचं उत्तर दिलं आहे.