यावल (प्रतिनिधी) – भुसावळ येथील महीला चळवळीतील सामाजीक कार्यकर्ता सौ . मिनाश्री सुनिल जावरे यांची जळगाव जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस सेवा फाउंडेशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
कॉंग्रेस ग्रामीण सेवा फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव आनंद यांच्या प्रेरणेने तथा महाराष्ट्र राज्य सेवा फाउंडेशनचे प्रदेश प्रभारी हुसैन अली भाटी तथा प्रदेश अध्यक्ष सुभाषचंद्र गोडसे यांच्या आदेशाने जळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील सत्तार पटेल यांनी सौ.मिनाश्री सुनिल जावरे यांची निवड केली आहे.
या निवडीचे काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले असुन , सौ . मिनाश्री जावेर यांना रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकराव चौधरी , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा पंचायत समिती गटनेता शेखर सोपान पाटील , जिल्हा परिषद गटनेते व काँग्रेसचे यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे , कॉग्रेस कमेटीचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान , पंचायत समिती सदस्या कलीमा सायबु तडवी, व सरफराज सिंकदर तडवी , उमाकांत रामराव पाटील यांच्यासह आदी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभीनंदन केले आहे .