यावल(प्रतिनिधी)- तालुक्यातील उंटावद येथील रहीवाशी तसेच उंटावद ग्रामपंचायतचे माजी सदस्य व दुध डेअरीचे विद्यमान संचालक सुधाकर उत्तमराव पाटील(वय ५४ वर्षे) यांचे शुक्रवार दि.२ एप्रील रोजी दुपारी १२ वाजता दिर्घ आजाराने निधन झाले विशेष म्हणजे सहा दिवसापुर्वीच दि.२८ मार्च रोजी रात्री १०:३० वा.त्यांचे वडील उत्तमराव नारायण पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते ते ८७ वर्षांचे होते.
वडीलांचे निधन झाल्यानंतर अवघ्या ६ दिवसांनी मुलाचे निधन झाल्याने पाटील परिवारासह उंटावद गावावर दुःखाचा डोगंर कोसळला आहे शेवटी नियतीचा खेळच अजब आहे व तो सर्वांना मान्य करावाच लागतो सुधाकर पाटील यांच्या पश्चातआई,दोनभाऊ,पत्नि,दोन मुले व सुन असा परीवार आहे ते गुलाबराव पाटील यांचे बंधू होत.