मुंबई, (प्रतिनिधी)- भाजपच्या टिकेनंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस सरकारच्या काळातील खडसेंच्या जमीन व्यवहारासंबंधी नेमलेल्या झोटिंग कमिटीचे पत्र ट्विट करून आघाडी सरकारनं देखील ‘सेम’ पत्र काढलं असून दोघां पत्रांमध्ये एकाही शब्दचं अंतर नसल्याचं म्हटलं होतं त्याच बरोबर खडसेंसाठी नेमलेल्या झोटिंग समितीला आयोग अधिनियम नुसार नेमल्याचा आपल्या शासनाचे एक तरी पत्र दाखवावे असं आव्हान दिलं होतं त्यावर भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ‘हा घ्या आपल्याला हवा असलेला कागद’म्हणत पलटवार केला आहे.
देवेंद्र फडणवीस आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की ”माझे परम मित्र जितेंद्र आव्हाड जी,
मुख्य सचिवांचा अहवाल कुणी लिहिला, हे काही आपण उगाच सांगत नव्हतो.
वाट पाहत होतोच आणि अपेक्षित परिणाम साधला गेला.
असो, हा घ्या आपल्याला हवा असलेला कागद.
काय आहे या पत्रात….
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जमीन व्यवहार चौकशी करिता गठीत करण्यात आलेली समिती 1952 अंतर्गत नेमलेली होती असं स्पष्ट निर्देश या पत्रातून दिल्याचे समजते.
भाजपचा काय आहे आरोप…
परमवीर सिंग यांनी दिलेल्या ‘लेटर बॉम्ब’ ची चौकशी करण्याकरिता राज्य सरकारने गठीत केलेली चांदिवाल समिती आयोग अधिनियम 1952 अंतर्गत नेमलेली नाही नसून जनतेला एप्रिल फुल केल्याचा आरोप भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
त्यामुळे या समितीला कोणालाही नोटीस बजावण्याचा अधिकारच नाही. तसेच समितीकडून संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावल्यावर उपस्थित राहीलेच पाहिजे असे बंधनही नसेल. त्यामुळे ही समिती म्हणजे केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून एप्रिल फूल बनवण्याचा प्रकार असल्याची टीका भाजपा केली होती.
फडणवीस यांनी हा घ्या आपल्याला हवा असलेला कागद घ्या असं ट्विट केल्यावर त्यावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट च्या माध्यमातून उत्तर देत म्हटलं आहे की चौकशी समिती नेमल्यावर हे पत्र पाच महिन्याने काढलं आहे, मग आता घाई का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.