Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आमदार किशोर अप्पा पाटील हे पुन्हा एकदा अकॅशन मोड मध्ये… वाचा

najarkaid live by najarkaid live
March 31, 2021
in जळगाव
0
कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आमदार किशोर अप्पा पाटील हे पुन्हा एकदा अकॅशन मोड मध्ये… वाचा
ADVERTISEMENT
Spread the love

पाचोरा (वार्ताहर) दि,३० पाचोरा भडगाव मतदार संघात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आमदार किशोर अप्पा पाटील हे पुन्हा एकदा अकॅशन मोड मध्ये आले असून त्यांनी पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयात मंगळवार दुपारी ३.३० वाजता प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांचेसह पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना स्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या.

या प्रसंगी त्यांनी पाचोरा व भडगाव शासकीय रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय साधन सुविधांसाठी किती निधी लागतो त्याची माहिती घेत त्वरित साहित्य खरेदी करून गोर गरीब रुग्णांना चांगला उपचार मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही , सोबतच अधिकारी, कर्मचारी व डॉक्टर्स बांधवानी देखील पहिल्या टप्यात केलेल्या कामा प्रमाणेच यंदा दुसऱ्या टप्यात देखील झोकून देत काम करण्याचे आवाहन केले.

मात्र जनतेनेही आपली जबाबदारी ओळखत शासन नियमांचे पालन करावे अन्यथा लॉक डाऊन शिवाय पर्याय नाही असा इशारा दिला. तदनंतर त्यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात जाऊन तेथील रुग्णांशी संवाद साधत तब्बेतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली याठिकाणी उपलब्ध असलेल्या सोळा बेडस व्यतिरिक्त पुन्हा नवीन सुमारे १८ ऑक्सिजन पुरवता येईल असे बेड निर्माण करण्याचे निश्चित करत त्याचे त्वरित काम सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीला उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, पाचोरा तहसीलदार कैलास चावडे, मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर, पोलीस उप निरीक्षक गणेश चौभे, तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमित साळुंखे, भडगावचे डॉ.प्रशांत पाटील, डॉ.भूषण मगर,नायब तहसीलदार विकास लाडवंजारी, संभाजी पाटील, श्री सोनार, अभिजीत येवले,भडगाव पालिकेचे परमेश्वर तावडे,स्वीय सहाय्यक राजेश पाटील, पत्रकार प्रवीण ब्राह्मणे, यांची उपस्थिती होती.

यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी पाचोरा उपविभागात असलेल्या प्रशासकीय कामांची माहिती दिली तर डॉ समाधान वाघ, डॉ अमित साळुंखे ,यांनी पाचोरा व डॉ प्रशांत पाटील यांनी भडगाव तालुक्यात सुरू असलेल्या वैद्यकीय उपचारांची माहिती दिली.सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेले लसीकरण, तपासणी कीट, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी बाबत त्यांनी माहिती घेतली.तसेच पाचोरा व भडगाव नगरपालिका हद्दीत घरोघरी जाऊन तपासणी करणे कामी टीमची निर्मिती करणे बाबत त्यांनी सूचना दिल्या
शहरी भागासह ग्रामीण भागात देखील गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांनी विविध सूचना करत ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समित्यांसह पोलीस पाटील बांधवांना खबरदारी घेत अशा ठिकाणी प्रसंगी दंडात्मक कारवाई करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच ग्रामीण भागात वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टर्सनी शहरात विविध कोविड केअर सेंटर मध्ये वा ग्रामीण रुग्णालयात सेवा बजावण्याचे आवाहनही आ.पाटील यांनी केले.

पाचोरा उपविभागातील काही हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांकडून विविध प्रकारचे सिटी स्कॅन,रक्त चाचण्यांचे रिपोर्ट्स ,रुग्णवाहिका, रेमेडिसिव्हर सह काही इंजेक्शनची शासनाने निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा चढ्या भावाने विक्री वा तपासण्या होत असल्याच्या काही तक्रारी प्राप्त होत असून याबाबत कोणाची काही तक्रार असल्यास नागरिकांनी प्रांताधिकारी, तहसीलदार यांचे कडे तक्रारी करण्याचे आवाहन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे.याबाबतचे शासनाने निर्धारित केलेले दर पुन्हा एकदा जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शरद पवारांवर ‘ब्रीच कँडी’ हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्रक्रिया

Next Post

जळगाव परिमंडलात इतके लाख ग्राहक वीजबिल ऑनलाईन भरून झाले डिजिटल….

Related Posts

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Next Post
भाजपच्या ‘या’ रणनीती मुळेच महावितरणाची थकबाकी.. हे पाप भाजपचेच… ऊर्जामंत्री काय म्हणाले वाचा…

जळगाव परिमंडलात इतके लाख ग्राहक वीजबिल ऑनलाईन भरून झाले डिजिटल....

ताज्या बातम्या

त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

June 30, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

June 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us