मुंबई, (प्रतिनिधी)- राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सरकारी जमिनीवर अनधिकृत बांधकाम करून कार्यालय थाटल्याचा आरोप करत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लोकायुक्त यांच्याकडे याचिका दाखल केली असून आता यावर अनिल परब काय भूमिका घेतात, या याचिकेतील आरोपांना कसं उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
भाजपचे माजी खासदार यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ही माहिती दिली असून त्यांनी म्हटलं आहे की, शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी सरकार/ म्हाडाची जागा बळकावीणे व अनधिकृत बांधकाम करणे, त्याचा विरोधात मी लोकायुक्तकडे याचिका दाखल केली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण…
वांद्रे येथील सरकारी असलेल्या म्हाडाच्या दोन इमारतींमधील मधल्या जागेत मंत्री अनिल परब यांनी अनधिकृतरित्या कार्यालय थाटल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी यापूर्वीच केला होता. कारवाई होत नसल्याने किरीट सोमय्या यांनी याचिका दाखल केली आहे.दोषींवर कारवाई ची मागणी याचिकेतून केली आहे.