मुंबई, (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गुजरात मध्ये भाजपाचे अमित शहा यांची भेट घेतल्याची दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा झाली तर गुजरात येथील एका वृत्तपत्राने या दोघांच्या भेटीचा दावा देखील केला आहे.
दरम्यान शरद पवार व प्रफुल्ल पटेल हे अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. मात्र एका गुजराती दैनिकात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे ‘षडयंत्र’ असून शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी केवळ अफवा असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिले आहे.