जळगाव, (प्रतिनिधी)- देशात कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण असणाऱ्या हॉटस्पॉट जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ९ जिल्हे आहेत. हे अतिशय धक्कादायक सांगत या उल्लेखनीय निष्क्रिय कामगिरीसाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना विशेष पुरस्कार दिला पाहिजे अशी खोचक टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करुन केली आहे.
कोरोनाची दुसरी लाट आल्यागत परिस्थिती असून दिवसेंदिवस राज्यात कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.शासन,प्रशासन शर्तीचे प्रयत्न करीत आहे, जनजागृती, कडक निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत तरी देखील संसर्ग आटोक्यात येत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.
कोरोना रुग्णांची लक्षनीय वाढत्या संख्यामुळे विरोधक आक्रमक होत असल्याचं दिसून येत आहे.