चोपडा:-(मिलिंद सोनवणे.)शहरासाठी नवींन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होणार असुन 60टक्के काम पुर्ण झाले आहे,उर्वरित 40 टक्के काम ही लवकर पुर्ण होईल आणि चोपडेकराना नवींन पाइप लाइन द्वारे दोन दिवसाआड पाणी मिळेल असे मुख्याधिकारी अविनाश गांगोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नवींन पाणी पुरवठा योजना ही 67 कोटि रूपयाची असुन सर्व शहराला नवींन रस्ते, गटारी,सुख सुविधा लवकरच देवू असेही त्यांनी सांगितले.जुन्या पाइप लाइन ला 31 मार्च पर्यन्त जूनी पाइप लाइन सुरु राहील,नन्तर ती बन्द करु असे ही ह्या वेळी सांगण्यात आले,नवीन नळ कलेक्शन सर्वानी घ्यावे,आणि चार हजार रुपये जे नवीन कलेक्शन ला लागणार आहेत त्यापैकी 2हजार रुपये नगर पालिक भरणार असुन नागरिकांना 50 टक्के सूट आम्ही देवू जनतेने लवकरात लवकर नवींन नळ कलेक्शन घ्यावे,घरपट्टी, पाणी पट्टी भरावी आणि नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे अशी माहिती अविनाश गांगोटे यांनी सांगितले.
31 मार्च पर्यन्त जे थकबाक़ीदर आहेत,त्यांनी जर एक रकमी रक्कम भरली तर त्यात त्यांना व्याजात 100टक्के सवलत देवू असेही नगरपालिका प्रशासनाकड़ू न सांगण्यात आले.आणि जे मोठे थकबाक़ीदार आहेत त्यांनाही 4 ते 5 टप्प्यात भरण्या ची सवलत देण्याच सांगितले,नवींन नळ कनेक्शन घेणाऱ्या लोकांना नळ कनेक्शन साठी साहित्य पुरविन्यात येईल,ज्यानी नवींन नळ जोड़नी आता नाही केली आणि त्यांच्या मर्जी नुसार जर ते वागले तर रस्त्याचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई ही नळ धारकाना च करावी लागेल असा ही निर्णय घेण्यात आला.
आज पत्रकार परिषदेत धककादयक माहिती समोर आली की चोपडा शहरात जवळपास 4हजार नळ कनेक्शन अवैध आहेत असेही नगर पालिका प्रशासना कडून सांगण्यात आले,
तर ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध नळ कनेक्शन कोणाच्या पाठ बळावर सुरु आहेत,यांना त्यांच्या वार्ड मधील नगरसेवकांची तर साथ नाही न? असा प्रश्न उपस्तीत होतो,कीती वर्ष्या पासून ह्या लोकांकडे काना डोळा होतोय?असा सवाल उपस्तीत होतो, आणि पालिकेचां महसूल ही जातोय तर हे नुकसान कोंन भरून काढेल?पाणी चोरी बद्दल त्यावर कारवाई का नाही केली असा प्रश्न पडतोय.
नवींन नळ कनेक्शन ची प्रक्रिया जो पर्यन्त पुर्ण होत नाही तोपर्यंत प्रशासनास नवींन रस्ते शहरात होऊ शक्कत नाहीत,कारण पुन्हा रस्ते खोदावे लागतात आणि खर्च वाया जातो,नगरपालिकेचे 13ते 14 कोटि रूपयांचे रस्ते मंजर आहेत काम रखडले आहेत,तसेच दलित वस्ती सुधार योजनेचे 2कोटि चे काम ही रखड़ली आहेत,म्हणून चोपडेकरानी नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे अशी माहिती ही मुख्याधिकारी यांनी सांगितले.
ह्यावेळी पत्रकार परिषदेला लोकनियुक्त नगराध्यक्ष मनीषा ताई चौधरी, गटनेते जीवन चौधरी,इंजीनियर सचिन गवांदे,सेनेचे गटनेते महेश पवार,हे व्यास पीठावर उपस्तीत होते,आणि इतर नगरसेवक उपस्थित होते.