मुक्ताईनगर,(प्रतिनिधी)- तालुक्यातील उचंदा येथे लग्नानिमित्त आलेल्या अल्पवयीन 16 वर्षीय मुलीवर तोंडाला रुमाल बांधून व हातपाय बांधून जबरीने अत्याचार केल्याची घटना 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजून 40 मिनिटांचे सुमारास घडली असून आरोपीला जळगाव येथून अटक करण्यात आली आहे.
तालुक्यातील उचंदा येथे 22 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजून चाळीस वाजेच्या सुमारास फिर्यादी अत्याचारित अल्पवयीन मुलगी घराशेजारीच पिठाच्या गिरणी मध्ये आपली राहिलेली चप्पल घेण्यासाठी गेली असता आरोपी चेतन रवींद्र सुतार वय 20 राहणार उचंदा याने संधी साधून पिठाच्या गिरणीचा दरवाजा बंद केला.तसेच तिच्या तोंडाला रुमाल बांधून आणि हातपाय बांधून जबरी अत्याचार केला आणि अत्याचारानंतर आरोपी चेतन हा फरार झाला. अल्पवयीन मुलीच्या आईच्य फिर्यादीवरुन अनुसूचित जाती जमाती कायदा आणि पोस्को ची कलम तसेच बालकांचे लैंगिक शोषणतून संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीता ही नेपानगर मध्य प्रदेश येथील रहिवासी असून उचंदा येथे काकांच्या लग्नासाठी तीन दिवसांपूर्वीच आलेली होती. दरम्यान पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आले असून आरोपी चेतन रवींद्र सुतार यास जळगाव येथून शिताफीने सूत्र हलवत एका ट्रकमधून उतरत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक लावंड तसेच पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी दुपारीच धाव घेतली आणि घटनास्थळी जाऊन परिस्थितीची माहिती करून घेतली. दरम्यान सायंकाळी उशिरा फॉरेन्सिक विभागाची टीम उचंदा येथे पोचली असून तपासणी करण्यात आली.