मुंबई – महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटर हॅण्डल वरून दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने शासनाच्या वतीने अनेक निर्बंध लावण्या बाबत कठोर पाऊले उचलले आहे. नागरिकांनी नियम पाळावे याकरिता शासन जनजागृती करत अवाहन करीत आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा देखील उगारला जात आहे. मात्र अद्याप राज्यात लॉकडाऊन बाबत शासनाने कुठेही अधिकृत जाहीर केलेले नाही. असं असतांना जर कुणी लॉकडाऊन बाबत खोटी अफवा पसरवत असेल तर अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.