आपल्या संगणकाला ‘धमक्यापासून’ वाचवा!
कुठल्याही अज्ञात स्रोतांमधून प्राप्त झालेल्या लिंकवर क्लिक करू नका. केवळ अधिकृत व विश्वसनीय लिंकचाच वापर करा असं अवाहन महाराष्ट्र पोलीस विभागानं आपल्या ट्विटर हॅण्डल वरून केलं आहे.
डिजिटल युगात युजर्संना ऑनलाइन बँकिंगची, व्यवहार, अनेक गोष्टींसाठी बऱ्यापैकी इंटरनेट व संगणक, मोबाईलची सवय झाल्याचे दिसत आहे. करोना काळात याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
याच बरोबर बँकिंग फ्रॉडच्या घटनेत सुद्धा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. डिजिटल युग सुरू झाले असले तरी त्याचा धोका सुद्धा वाढल्याचे चित्र देशात पाहायला मिळत आहे. त्यामुळे सावधानता बाळगणे आवश्यक आहे. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांनी अलर्ट राहणे गरजेचे आहे. सायबर गुन्हेगारी करण्यासाठी गुन्हेगार वेगवेगळे फंडे वापरत आहेत.
त्यामुळे महाराष्ट्र पोलीस विभागाने एक अलर्ट जारी करून नागरिकांना महत्त्वाची सूचना देत कुठल्याही अज्ञात स्रोतांमधून प्राप्त झालेल्या लिंकवर क्लिक करू नका. केवळ अधिकृत व विश्वसनीय लिंकचाच वापर करा असं अवाहन केलं आहे.