भंडारा, (प्रतिनिधी) – दहा निरागस चिमुकल्यांचा जीव घेणाऱ्या भंडारा शासकीय रुग्णालय आग प्रकरणी अखेर दोन परिचारिकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी आधी अपघाती मृत्यूची नोंद करुन तपास सुरु करण्यात आला होता तपासाअंती आता या प्रकरणात दोन परिचारिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन्ही परिचारिकांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. परिचारिका शुभांगी सातवणे व स्मिता आंबीलढुके असं या दोन आरोपी महिलांची नावं आहेत.याबाबत राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.