जळगाव ,(प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत सतत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज 169 बाधित रूग्ण आढळून आले आहेत तर 55 रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे. जळगाव शहरासह चाळीसगाव तालुक्यातही कोरोना रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे.
जिल्हयात सध्या 667 ऍक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.आज 169 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने बाधित रुग्णांची संख्या 58021 इतकी झाली आहे.आज दिवसभरात बाधित रुग्णांची मृत्यूची नोंद नसून आजपर्यंत 1369 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.