जळगाव शहर ब्राह्मण सभा येथे अखिल भारतीय ब्रह्म महाशिखर (India) महाराष्ट्राचे अध्यक्ष, कार्यकारीणी सदस्य तसेच जळगाव शहरातील ब्राह्मण ज्ञाती संस्थेचे पदाधिकारी यांची एकत्रित गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली.
या गोलमेज परिषदेची सुरूवात अखिल भारतीय ब्रह्म महाशिखर संस्थेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष-मा. श्री. निखीलजी लातूरकर व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व भगवान श्री परशुरामांचे पुजन करून करण्यात आली. तसेच भगवान परशुरामकी जय, जय जय परशुराम अशा घोषणांनी कार्यालय दुमदुमले होते. अध्यक्षांचे स्वागत, सत्कार व कार्यकामाची प्रस्तावना जळगाव येथील गोलमेज परिषदेचे संयोजक-निलेशजी कुळकर्णी यांनी केले. या गोलमेज परिषदेत खालील 13 विषयांवर सविस्तर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले.
(1) ब्राह्मण समाजाला अल्पसंख्यांक दर्जा मिळावा (2) स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे (3) पुरोहितांना मानधन मिळावे (4) वर्ग-2 इनामी जमिनी वर्ग-1 करून खाजगी मालकीच्या करू देणे- (5) महापुरूषांच्या बदनामी विरोधी कायदा करण्यात यावा (6) स्वातंत्र्यवीर सावरकर यांंना भारतरत्न मिळावा (7) पुण्यातील श्री. दादोजी कोंडदेव व श्री. राम गणेश गणकरी यांचे पुतळे पुन्हा बसवावे. (8) श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे श्रीवर्धन येथे भव्य स्मारक उभारण्या यावे (9) जिल्हास्तरीय ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारावे (10) छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे (11) जळगाव शहरामध्ये किंवा जळगाव शहरालगत भगवान श्री. परशूरामांच्या मंदिरासाठी जागा मिळावी (12) ब्राह्मण समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी. (13) श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या समाधीचा जिर्णोद्धार व्हावा.
या गोलमेज परिषदेला विविध ब्राह्मण ज्ञाती संस्थांचे सु. द. पुराणिक, सुरेशजी मुळे, सचिन वाडेपाटील, गजानन जोशी, श्रीकांत कुळकर्णी, साकेत खोचे, सचिनजी नारळे, नितिन कुळकर्णी, अशोक साखरे, सुनिल याज्ञीक, अशोक वाघ, अशोक जोशी, वसंत देखणे, सचिन चौघुले, हेमंत वैद्य, ऍ़ड अश्विनी डोलारे, नितिनजी पारगावकर, आनंद दशपुत्रे, दिनकर जेऊरकर, व्हि. पी. कुळकर्णी, अजय डोहळे, रविंद्र जोशी, डॉ. निलेश राव तसेच महिला पदाधिकारी- स्वाती पातळे, ईश्वरीताई जोशी, स्वाती कुळकर्णी, रेखा कुळकर्णी, वृंदा भालेराव, मुग्धा दशरथी, ममता जोशी, रेवती लव्हेकर, रुपाली कुळकर्णी, अमला पाठक, वैशाली नाईक, निर्मला जोशी, पल्लवी उपासनी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौ. श्रद्धा शुक्ल तसेच आभार प्रदर्शन भुपेश कुळकर्णी यांनी केले. तसेच अनंत देसाई, हेमंत वैद्य, संग्राम जेऊरकर, संकेत तारे, निरंजन कुळकर्णी, भूषण मुळे, अविनाश जोशी, तेजस जोशी, राजेश कुळकर्णी, दिपक भट, प्रकाश मुळे, संतोष दप्तरी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.