जळगाव (दि ७.प्रतिनिधी) फळे व भाजीपाला हमाल मापाडी जनरल कामगार संघटना अध्यक्ष धुडकू सपकाळे यांचेवर प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ व आरोपीना तात्काळ अटक करून कठोर शासन करण्यासाठी कामगार संघटनेच्या वतीने फळे व भाजीपाला मार्केट जळगाव या ठिकाणी काम बंद आंदोलन करीत आहेत . तरी आज रात्री पासून कुठलीही भाजीपाला व फळे मार्केट मध्ये गाडी खाली किंवा भरली जाणार नाही . याची नोंद सर्व व्यापारी , आडात दुकानदार ,ग्राहक ,व शेतकरी यांनी घ्यावी असे फळे व भाजीपाला हमाल मापाडी जनरल कामगार संघटनेच्या वतीने रमेश बिर्हाडे, संजय बोरसे, नितीन पाटील, शेख इस्माईल शेख हारून बागवान आदींनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.