चाळीसगाव,(प्रतिनिधी)-तालुक्यातील सांगवी येथे कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत घेण्यात येणाऱ्या शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी येथे शेतकऱ्यांना ५०० लिटर निंबोळी अर्काचे वाटप सांगवी गावाचे कृषी सहाय्यक तुफान खोत यांनी केले तसेच शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतीशाळेत निंबोळी अर्क फवारणी तसेच विषारी औषधांची ओळख यावर मार्गदर्शन शेतीशाळा प्रशिक्षक श्रीकांत राजपूत यांनी केले तसेच कॅप वाटप करण्यात आले.
या प्रसंगी गावाचे सरपंच डॉ.महेंद्र राठोड, उपसरपंच बंडू चव्हाण, रमेश राठोड यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. या शेती शाळेच्या कार्यक्रमामुळे कृषी विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.