मुक्ताईनगर – तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे अज्ञात लोकांनी रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृतपणे स्थापित केल्याचा प्रकार आज उघडकीस आला.त्या नंतर पोलिसांनी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविलेले आहे.आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडालेली होती. पोलिसांनी सकाळीच घटनास्थळी धाव घेत संबंधीत पुतळा काढण्याचे काम सुरू केल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण होऊन काहींनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या दिशेने दगडफेक केली यात एक पोलिस किरकोळ जखमी झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक डाॕ प्रविण मुंढे यांनी दिली. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे आता परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे.सदरील पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतलेला आहे.निमखेडी गावात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.