जळगाव: प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे संस्थापन पिताश्री प्रजापिता ब्रह्मा यांच्या स्मृतीदिवस 18 जानेवारी संपूर्ण जगात विश्वशांती दिवस म्हणून पाळला जात आहे.
पिताश्री प्रजापिता ब्रह्मा यांनी आपले संपूण जीवन मनुष्यमात्रांच्या सेवेसाठी समर्पित केले. आपल्या मन, वचन आणि कर्माद्वारे त्यांनी परमापिता शिव परमात्म्याचे ज्ञान आणि राजयोग जनमानसात प्रवाहित केले. त्यांनी
दि. 18 जानेवारी, 1969 रोजी त्यांनी मानवी देहाचा त्याग केला. त्यांच्या कार्याची स्मृती म्हणून संपूर्ण जगभरात त्यांचा स्मृतीदिवस विश्व शांती दिवस म्हणून पाळला जातो.
यानिमित्ताने ब्रह्माकुमारीज सेवाकेंद्रात 18 जानेवारी रोजी सामूहिक योगाभ्यास केला जाणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या महावचनाचे वाचन करण्यात येईल. तरी सर्व नागरीकांनी विश्वशांती दिवसानिमित्त आपल्या आपल्या स्थानिक सेवाकेंद्रात उपस्थित रहावे असे आवाहन ब्रह्माकुमारी मीनाक्षी दीदी यांनी केले आहे.