जळगाव, (प्रतिनिधी)- येथील शिक्षक युवराज शंकर सुरडकर यांना विश्व समता कला मंचच्या वतीने नुकताच राज्यस्तरीय विश्व् समता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
विश्व समता कला मंचच्या वतीने विविध क्षेत्रातील 32 मान्यवरांना हा पुरस्कार जाहीर झाला असून जळगाव जिल्ह्यातून शिक्षक असलेल्या युवराज सुरडकर यांना
राज्यस्तरीय विश्व् समता पुरस्कार जाहीर करण्यात आला असून या पुरस्काराबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे व इतर मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.