Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थिनी उद्योजकता क्लब’ स्थापन होणार

najarkaid live by najarkaid live
January 4, 2021
in राज्य
0
विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थिनी उद्योजकता क्लब’ स्थापन होणार
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई, दि. ४ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून राज्यातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमध्ये स्वतंत्र ‘महिला उद्योजकता कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमधील ३० टक्के निधी महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी वापरणे, विद्यार्थीदशेतच महिलांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थिनी उद्योजकता क्लब’ स्थापन करणे असे विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

कौशल्य विकास मंत्री श्री.मलिक म्हणाले की, सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येपैकी ४८ टक्के महिला असून देशातील एकूण उद्योजकांपैकी फक्त १४ टक्के महिला उद्योजक आहेत. राज्यात सध्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह, महाराष्ट्र स्टार्टअप आणि इनोव्हेशन यात्रा, नवउद्योजकांना पेटंट मिळविण्यासाठी तसेच गुणवत्ता परिक्षणासाठी आर्थिक सहाय्य योजना अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. आता यापुढे या सर्व उपक्रमांमध्ये महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येईल. यासाठी सोसायटीमध्ये स्वतंत्र महिला उद्योजकता कक्ष स्थापन करण्यात येईल.

महिला उद्योजकता कक्षामार्फत महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध शासकीय विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, नॅसकॉम, सीआयआय, फिक्की, असोचॅम आदी विविध नामांकीत संस्थांसमवेत भागीदारी करण्यात येईल. महिला बचतगट, महिला उद्योजक यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येईल. या उपक्रमांतर्गत महिलांना स्वव्यवस्थापन, आर्थिक व डिजिटल साक्षरता, व्यवसाय नियोजन व विकास आदी प्रशिक्षणे देण्यात येतील. याशिवाय महिला उद्योजकांसाठी नवीन इनक्यूबेटर्स स्थापित करणे, विद्यमान इनक्युबेटर्समार्फत महिला उद्योजकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करणे, मार्गदर्शन करणे यावर हा कक्ष लक्ष केंद्रीत करेल. महिला उद्योजकांच्या चालविण्यात येणाऱ्या विकसीत स्टार्टअप्सच्या विस्तृतीकरणासाठी व त्यांच्या उद्योगास चालना देण्यासाठी विविध एक्सलरेटर कार्यक्रम राबविण्यात येईल. महिलांचे नेतृत्व असलेल्या स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यात अर्थसहाय्य करणे, विकसीत स्टार्टअप्सना अधिकृत निधीकरिता स्टार्टअप परिसंस्थेतील गुंतवणूकदारांशी समन्वय साधून देणे, संशोधन व विकास क्षेत्रात तसेच तांत्रिक उद्योजकता क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या महिलांना विशेष अनुदान पुरविणे इत्यादी करिता महिला उद्योजकता कक्षामार्फत विविध उपक्रम व योजना राबविण्यात येतील, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

मुलींमध्ये विद्यार्थी दशेतच उद्योजकता विकसीत करण्यासाठी महिला उद्योजकता कक्षामार्फत राज्यातील विविध विद्यापीठे, महाविद्यालये, महिला महाविद्यालये आदींमध्ये विद्यार्थिनी उद्योजकता क्लब स्थापन करण्यात येईल. या क्लबमार्फत विद्यापीठस्तरावर तसेच आंतरविद्यापीठ, आंतरमहाविद्यालयीन स्तरावर परिसंवाद, प्रशिक्षणे, अभ्यासदौरे, मार्गदर्शन शिबीरे आयोजित करण्यात येतील. विद्यापीठांमध्ये सध्या कार्यरत असलेल्या गांधी विचारधारा केंद्र, ग्रामीण अध्ययन केंद्र, महिला विकास कक्ष याप्रमाणे ‘विद्यार्थिनी उद्योजकता केंद्र’ स्थापन करण्यात येतील.

या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी कार्यकारी व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार असून यामध्ये कौशल्य विकाससह महिला-बालविकास, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग या विभागांचे सचिव, एसएनडीटी महिला महाविद्यालयाचे कुलगुरु, महिलांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकीत संस्था, युएनडीपी, युएन वुमन, युनिसेफ यांचे प्रतिनिधी आदींचा समावेश असेल, अशी माहितीही मंत्री श्री.नवाब मलिक यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

औरंगाबाद बलात्कार प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करा ; भाजपा उपाध्याक्ष चित्रा वाघ यांची मागणी 

Next Post

शिवनेरी फाउंडेशन संचलित भूजल अभियाना अंतर्गत वडाळा येथे शिवार फेरी

Related Posts

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

June 30, 2025
पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?

पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?

June 30, 2025
Next Post
शिवनेरी फाउंडेशन संचलित भूजल अभियाना अंतर्गत वडाळा येथे शिवार फेरी

शिवनेरी फाउंडेशन संचलित भूजल अभियाना अंतर्गत वडाळा येथे शिवार फेरी

ताज्या बातम्या

IIPS मुंबई भरती २०२५: Senior Research Officer पदासाठी थेट मुलाखत – ७ जुलैला संधी

July 2, 2025
How to Lose Weight Fast

How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

July 2, 2025
“Jio-recharge-plans-2025

Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाज के लिए एक तूफानी ‘शेरनी’

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाजासाठी एक झंझावाती ‘वाघीण’

July 2, 2025
New Vehicle Tax System Maharashtra

New Vehicle Tax System Maharashtra ; वाहन खरेदी महागणार

July 2, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us