गौरवकुमार पाटील / अमळनेर – तालुक्यातील शिरसाळे बुद्रुक येथे सट्टा व झन्ना मन्ना जुगार खेळताना डीवायएसपीच्या सह पथकाने धाड टाकून काल सायंकाळी सहा जणांना पाच मोटार सायकलिंगसह १ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून रंगेहात सहाही जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले की डीवायएसपी राकेश जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिरसाळे बुद्रुक येथे गावं विहिरीच्या च्या बाजूला सार्वजनिक ठिकाणी काही लोक झन्ना मन्ना हा जुगाराचा प्रकार पैसे लावून खेळत आहेत अशी डीवायएसपी जाधव यांनी पथकातील कर्मचारी कळवली व आपल्या पथकासह तात्काळ शिरसाळ्या कडे रवाना झाले या पथकात डीवायएसपी राकेश जाधव ,हवालदार हितेश बेहेरे,प्रशांत पाटिल,कैलास सळूखे,सुहास पाटिल यांचे पथक शिरसाळे तेथे पोहोचल्यावर गाव विहिरीच्या बाजूला काही लोक पैशांवर जुगार खेळताना निदर्शनास आले.
जुगार खेळणाऱ्यावर पथकाने चोहू बाजूने घेरून छापा टाकला असता त्यात सहा जणांना जागेवरच पकडण्यात आले त्यात रईस शेख मज्जित वय ३१, पंडित पितांबर पाटील वय ४७ ,निसार शेख नसीर वय ५०, सिरजुद्दिन शेख वय ३८ राहणार शिरसाळे पोपट अर्जुन चौधरी वय ६६ वरील सर्व राहणार शिरसाळे ता अमळनेर संभाजी आत्माराम पाटील वय ५२ राहणार पिंपळे यांचेकडून पाच वेगवेगळ्या कंपनीच्या मोटारसायकलिंसह त्यांची किंमत १ लाख रुपये व रोकड २५ हजार ६७२ रुपयांचा असा एकूण १ लाख २५ हजार ६७२ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
एकूण मुद्देमाल पंचा समोर हस्तगत करून जप्त करीत वरील सहा आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली असून हवालदार हितेश बेहेरे यांच्या फिर्यादीवरून वरिल सहा ही आरोपींन विरुद्ध मारवाड पोलिस स्टेशनला मुंबई जुगार ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास हवालदार प्रकाश साळुंखे करीत आहेत