पाचोरा, (प्रतिनिधी) – पाचोरा न.पा.च्या स्वच्छता अभियाना संदर्भात पत्रकार संदीप महाजन यांनी काही तक्रारी करुन पाठपुरावा केला असता या प्रकरणाची नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दखल घेत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्र देऊन चौकशी करण्याचे सांगितलं आहे.
याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी दोन वेळा दखल घेऊन देखील त्यांच्या पत्राची दखल न घेता पाचोरा न.पा.प्रशासनाने त्या पत्रांना केराची टोपली दाखवली होती.
अखेर सदर प्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक नाशिक परिमंडल विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी सदर तक्रारीची दखल घेत सदर प्रकरणी चौकशी लावल्याचे पत्र संदीप महाजन यांना प्राप्त झाले आहे.
तर जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी देखील उपविभागीय अधिकारी यांना या प्रकरणाची चौकशी करुन स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सात दिवसाच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले आहे.