जळगाव : येथून उमाळा रोड, नशिराबाद स्थित श्रीराम फाऊंडेशन संचलित श्री साईराम प्लास्टिक अॅन्ड इरिगेशन कंपनीत दिनदर्शिका-२०२१ चे दर्जी फाऊंडेशन चे संचालक गोपाल दर्जी व उपशिक्षण अधिकारी (प्राथमिक ) विजय पवार यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.
श्रीराम फाऊंडेशन दरवर्षी दिनदर्शिका प्रसिद्ध करुन आपल्या सन्माननीय ग्राहकांना वितरीत करीत असते. या दिनदर्शिकेत विविध तिथी व नाविन्यपूर्ण माहितीचा समावेश असतो.
यावेळी श्रीराम फाऊंडेशन चे अध्यक्ष श्रीराम पाटील, संचालक प्रमोद पाटील, महाव्यवस्थापक धनराज चौधरी, प्रविण महाजन, प्रविण पाटील, जयवंत भालेराव व इतर मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन जयवंत भालेराव यांनी तर प्रास्ताविक धनराज चौधरी यांनी केले.