जळगाव, (प्रतिनिधी)- येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयाच्या हॉल मध्ये कर्मचाऱ्यांच्या बैठकस्थळी पाणी गळती होऊ लागले असून दुरुस्ती कडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सपशेल दुर्लक्ष असल्याचं समजतं.
याबाबत सविस्तर असे की, शल्यचिकित्सक कार्यलया शेजारीच असलेल्या हॉल मध्ये कर्मचारी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी स्लॅबमधून पाणी गळती लागली असून यामुळे भिंतींना सर्दवा आला आहे. सदर पाणी हे वरच्या मजल्यावरील बाथरूम मधील लिकेज पाण्यामुळे असल्याचं समजतं.घाण पाणी या ठिकाणी लिकेज झाल्यामुळे त्याची दुर्गंधी देखील येते. यामुळे या ठिकाणी बसणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सदर पाणी लिकेज संदर्भात अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव यांना पत्र व्यवहार करूनही दुरुस्ती होतं नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.