जळगाव, (प्रतिनिधी)- माजी मंत्री भाजपा नेते गिरीश महाजन यांनी आज दि.24 रोजी राळेगणसिद्धी येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन केंद्र शासनाने केलेल्या नवीन कृषी कायद्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
यावेळी सदर कृषी कायद्या संदर्भात विस्तृत चर्चा करुन कायद्याबाबत त्यांचे मत जाणून घेतले.
तसेच ह्या कायद्यातील तरतुदी शेतकरी बांधवांसाठी कश्या लाभदायक आहेत ह्याबदद्ल माहिती दिली.