जळगाव – भाजपच्या “महाजानदेश यात्रे” दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मी भाजपात प्रवेश करत असल्याची अफवाच आहे.भाजपा कडून माझ्याशी याविषयी कुणीही बोललेले नाही किंवा मी भाजप प्रवेशाबाबत कुणाशीही बोललेलो नाही.गेल्या दोन दिवसा पासून मी मतदार संघात काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत बैठकी घेत असून बुधवार पासून मतदार संघात जनसंवाद यात्रा काढून मतदारांशी थेट संपर्क साधणार आहे.त्यामुळे भाजप प्रवेशाचा प्रश्नच येत नाही असे रावेर मतदार संघांचे माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी “दैनिक नजरकैद” शी बोलतांना स्पष्ट केले.
रावेर मतदार संघांचे काँग्रेसचे माजी आमदार शिरीषदादा चौधरी हे भाजपात प्रवेश करत असल्याची चर्चा जोरात रंगू लागली होती म्हणून याबाबत श्री.चौधरी यांच्याशी संपर्क केला असता भाजप प्रवेशाचा साफ इन्कार केला आहे.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात प्रवेशाची मेघा भरती सुरूच आहे.राष्ट्रवादी, काँग्रेस चेअनेक दिगग्ज नेते लाईन लावत भाजपात प्रवेश करीत आहे.”महाजानदेश यात्रा” निमित्त काल जलसंपदामंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन खान्देशातील अनेक नेते भाजपात येत असल्याचे सूचक वक्तव्य केले होते त्यामुळे रावेर मतदार संघांचे माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रवेशाच्या बातमीला महत्व प्राप्त झाले होते.श्री.चौधरी भाजपात प्रवेश करताय याबाबत आज काही माध्यमांनी देखील वृत्त प्रकाशित केल्याने काँग्रेस राष्ट्रवादी गोटात खळबळ उडाली होती.मात्र याबाबत शिरीषदादा चौधरी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी भाजपा प्रवेशाची बातमी अफवा असून मी भाजपात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.