Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिवाळी अधिवेशनात ‘हे’ नऊ विधेयके झाली मंजूर

najarkaid live by najarkaid live
December 15, 2020
in राज्य
0
हिवाळी अधिवेशनात ‘हे’ नऊ विधेयके झाली मंजूर
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई, दि. १५ : – विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन-२०२० आज संस्थगित झाले. हिवाळी अधिवेशन -२०२० या दोन दिवसांच्या अधिवेशनात मांडण्यात आलेली विधेयके आणि त्याबाबतचा तपशील पुढील प्रमाणे – 

दोन्ही सभागृहात संमत विधेयके – 9

विधान सभेत प्रलंबित विधेयके – 1

विधान परिषदेत प्रलंबित विधेयके – 0

संयुक्त समितीकडे पाठविलेली विधेयके – 1

एकूण विधेयके – 11

दोन्ही सभागृहात संमत विधेयके 

१)     सन २०२० चे विधानसभा विधेयक क्र. 54- महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2020 (पुन:स्थापनार्थ, विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

(२)    सन २०२० चे विधानसभा विधेयक  क्र. 48 –  मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, 2020, (मुद्रांक शुल्कात केलेल्या कपाती प्रमाणे अधिभारामध्ये कपात करण्याची तरतूद करणे) (नगर विकास विभाग) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 16) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

(३)    सन २०२० चे विधानसभा विधेयक  क्र. 44 – महाराष्ट्र सहकारी संस्था (चौथी सुधारणा) विधेयक, २०२०, (कोविडमुळे, सहकारी संस्थांमधील महत्वाच्या विषयांना मंजुरी देण्यासाठी संचालक मंडळांना अधिकार देणेबाबतची तरतुद) (सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 17 ) (पुर:स्थापित दि. 14.12.2020 विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

(४)    सन २०२० चे विधानसभा विधेयक  क्र.45 – महाराष्ट्र सहकारी संस्था (पाचवी सुधारणा) विधेयक, २०२०, (कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ३१ मार्च २०२१ पर्यत घेण्यास, लेखापरिक्षण अहवाल ३१ डिसेंबर २०२०  पर्यत सादर करण्यासाठी वाढ करणे व गृह निर्माण संस्थेच्या विद्यामान समितीचे संचालक हे नविन संचालक मंडळ गठीत होईपर्यत कामकाज पाहतील अशी तरतुद करणे) (सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 18 ) (पुर:स्थापित दि. 14.12.2020 विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

(५)    सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र. 46- महाराष्ट्र  महानगरपालिका, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, 2020, (कोविडच्या पार्श्वभूमीवर नजिकच्या काळामध्ये निवडणुका न झालेल्या 12 नागरी स्थानिक संस्थामधील प्रशासकांच्या नियुक्तीच्या कालावधी 6 महिन्यापर्यत वाढविणे) (नगर विकास विभाग) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 19) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

(६)    सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र. 47- मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2020 (कोविड-19 संसर्ग सार्वत्रिक साथ रोगामुळे सन 2020-21 मध्ये मालमत्ता करातुन सुट तसेच सवलत देण्याकरिता कलम 154 मध्ये पोट-कलम (1ड) नव्याने दाखल करण्याबाबत.)  (नगर विकास विभाग) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 20) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

(७)    सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र. 50- महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२० (कोरोना विषाणुच्या प्रार्दुभावामुळे नवीन महाविद्यालय, नवीन पाठयक्रम,  विषय  विद्याशाखा अतिरिक्त तुकडी इत्यादी सुरू करण्याची परवानगी कार्यपध्दतीचे सन २०२०-२१ यावर्षी करिता नवीन वेळापत्रक विनिर्दिष्ट करणे.) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 21) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

(८)    सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र. 49 – डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापुर विधेयक, 2020 (स्वयं अर्थ सहाय्य विद्यापीठ स्थापन करणे) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

(९)    सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र. 53 –  महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक, 2020 (आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करणे) (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, विधानसभेत विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

 संयुक्त समितीकडे पाठविलेली विधेयके

(१)        सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र. 51 – शक्ति फौजदारी कायदा (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020, ( महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या अनुषंगाने भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 व मुलांचे लैगिक गुन्ह्यांपासून प्रतिबंध अधिनियम, 2012 यामधील तरतूदींमध्ये सुधारणा करणे, नविन कलमांचा समावेश करणे, शिक्षेत वाढ करणे (गृह विभाग) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, संयुक्त समितीकडे पाठविण्याचा ठराव संमत दि. 15.12.2020).

स्थापन करण्यात आलेली २१ सदस्यीय (विधान परिषद सदस्य ७, आणि विधानसभा सदस्य १४) संयुक्त चिकित्सा समिती अशी – गृहमंत्री अनिल देशमुख (अध्यक्ष), सदस्य – सर्वश्री अॅड. अनिल परब, शशिकांत शिंदे, भाई जगताप, अमोल मिटकरी, भाई गिरकर, विनायक मेटे, कपिल पाटील (सर्व विधानपरिषद सदस्य). श्रीमती मनिषा चौधरी, श्रीमती देवयानी फरांदे, श्रीमती श्वेता महाले, अॅड. राहूल नार्वेकर, श्रीमती माधूरी मिसाळ, अॅड.भारती लव्हेकर, श्री. सुरेश वरपूडकर, श्रीमती प्रणिती शिंदे, श्रीमती सरोज अहिरे, श्री. जितेंद्र आव्हाड, श्रीमती यामिनी जाधव, सर्वश्री सुनिल प्रभू, दिपक केसरकर, रईस शेख (विधानसभा सदस्य).

विधानसभेत प्रलंबित विधेयके

(१)    सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र. 52 – महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये (शक्ति कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरूध्दच्या विवक्षित अपराधांसाठी) विधेयक, 2020 (गुन्ह्यास आळा घालणे आणि गुन्ह्यातील तपास जलद गतीने करण्यासाठी विशेष पोलीस पथके निर्माण करणे, अशा प्रकरणांसाठी स्वतंत्र अनन्यसाधरण न्यायालये निर्माण करून ३० कामकाज दिवसांच्या कालावधीत प्रकरणे निकाली काढण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे) (गृह विभाग) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, विधानसभेत विचारार्थ दि. 15.12.2020).

विधिमंडळाचे २०२१ मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्च २०२१ पासून बोलाविण्यात येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्य पाणी व स्वच्छता मिशनमध्ये सेवा तत्त्वावर विविध पदांची भरती

Next Post

इंडियन कोस्ट गार्डमध्ये असिस्टंट कमांडंट जनरल पदांची भरती

Related Posts

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

June 29, 2025
मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

June 29, 2025
महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025
Next Post
इंडियन कोस्ट गार्डमध्ये असिस्टंट कमांडंट जनरल पदांची भरती

इंडियन कोस्ट गार्डमध्ये असिस्टंट कमांडंट जनरल पदांची भरती

ताज्या बातम्या

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

June 29, 2025
मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

June 29, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us