पाचोरा,(प्रतिनिधी) – पाचोरा येथील भडगाव रोड परिसरात रात्रीच्या वेळी शतपावली करण्यास पती पत्नी फिरत असताना अवैध वाळू व्यावसायिक युवकाने मोटरसायकलवर येऊन पतीस मारहाण करीत पत्नीचा विनयभंग केल्याची घटना घडली असून पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
दि १२ रोजी रात्री ९:३० वाजता जिजामाता काॅलनी पाचोरा येथील पती पत्नी शतपावलीसाठी फिरत असताना येथील लीलावती हॉस्पिटल समोर वाळु व्यवसाय करणाऱ्या भैय्या संजय पडोळ (पुनगाव रोड पाचोरा) या युवकाने मोटरसायकलवर येऊन पतीस अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत मारहाण केली याचवेळी बरोबर असलेल्या त्यांच्या २४ वर्षीय पत्नीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून विनयभंग केला.