जळगाव, (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलनास आज ‘भारत बंद’ करण्यात आले होते यास पाठिंबा दर्शविण्यासाठी व कामगार विरोधी लेबर कोड रद्द करण्याच्या मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी यांनी झोन सचिव एस. के. लोखंडे यांच्या नेतृत्वात काळ्या फिती लावून काम करण्यात आले.
यावेळी संघटनेचे आर. आर. राठोड, व्ही. के. चव्हाण, शशिकांत फुगारे, पवन नंदर धने, देवेंद्र बेंडाळे, मीनाबाई इंगळे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.