जळगाव – विद्यमान चेअरमन सौ. मंदाताई खडसे यांच्या कार्यकाळात दूध संघाचे रेकॉर्ड विना परवानगी जाळून टाकले असल्याचा आरोप जिल्हा दूध उत्पादक संघांचे माजी सुरक्षा अधिकारी एन. जे. पाटील यांनी पत्रकार भवन येथे आयोजित आज दि.7 रोजी पत्रकार परिषदेत केली आहे.
एन. जे. पाटील पत्रकार परिषदेत बोलतांना म्हणाले की, जिल्हा सहकारी दूध संघाचे सन 1975 ते 2000 पर्यंत सर्व रेकॉर्ड विद्यमान चेअरमन सौ मंदा एकनाथ खडसे यांच्या काळात जाळून टाकण्यात आले आहे. या कारवाईसाठी महाराष्ट्र शासन, पोलीस विभाग आणि न्यायालयाची परवानगी घेण्यात आलेली नाही त्यामुळे पोलिसांकडे दाखल तक्रारींच्या तपासात आणि न्यायालयीन कामकाजात अडथळे येण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्हा दूध संघ ताबापासून 1995 ते 2012 दरम्यान एनडीडीबीकडे होता. या काळात दूध संघात काम केले त्यात अनेक प्रकारचे गैरनिर्णय घेतले. याविषयी मी स्वतः मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात फौजदारी अर्ज केला. दिनांक 13 /10/ 2013 रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला अनुसरून 13 /12 /2013 ला जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार 182 /2013 दाखल केलेली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही पोलीस तपास होणे बाकी आहे.रेकॉर्ड नष्ट करण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक होते. आता तर जळगाव जिल्हा दूध संघाचे रेकॉर्ड नष्ट झालेले आहे याच विषयाच्या संदर्भात मी जळगाव न्यायालयात कोर्टात फौजदारी खटला 201 / 2018 दाखल केलेला आहे. त्यामुळे रेकॉर्ड नष्ट करताना न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक होते. रेकॉर्ड नष्ट करण्याचा हा मुद्दा अत्यंत गंभीर असून जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ झालेल्या अनेक प्रकारचे पुरावे नष्ट होण्याची भीती आहे. याविषयी विद्यमान चेअरमन त्यांनी जाहीर खुलासा करावा अशी मागणी आहे.
जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या बोकांडी 117 कोटी देणे
एकनाथ खडसे मंत्री असताना त्यांच्या दबावामुळे जिल्हा सहकारी दूध संघाची अनुभवी संचालक गप्प बसल्याने 16/ 8/ 2017 रोजी मंदा खडसे या चेअरमन झाल्यात तेव्हापासून आजपर्यंत मंदाताई खडसे या चेअरमन आहेत. सौ. खडसे या चेअरमन होत असतांना दूध संघावर कोणत्याही वित्तीय संस्थेचे कर्ज नव्हते. होते उलट जिल्हा दूध संघाचे ठेवी व इतर बँकांमध्ये होत्या. अखेरचा 31 रोजी ताळेबंद घेतला असता जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघावर 60 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्याचे दिसते. माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राज्य सरकारमधील प्रभावाचा वापर करून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनेतून सुमारे 57 कोटी रुपयांचे अनुदान घेतले याचा अर्थ कर्ज आणि अनुदान स्वरूपातील 117 कोटी रुपयांमध्ये विद्यमान चेअरमन यांनी जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या असा कोणता विकास केला हा प्रश्न विचारात असून त्यांनी त्याचा अधिकाऱ्यांचा खुलासा करावा अशी मागणी एन.जी.पाटील यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.