चाळीसगाव,(प्रतिनिधी)- चाळीसगाव तालुक्यातील वडाळा येथे दि.26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला यावेळी कोरोना चे सर्व नियम पाळून राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानाचे वाचन शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश निकुंभे यांनी केले तसेच लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, ही संविधानातील मूल्य आणि राष्ट्राची एकता व एकात्मता बळकट व्हावी यासाठी नागरिकांनी कर्तव्याचे पालन करावे असे मत मुख्याध्यापक प्रकाश निकुंभ यांनी व्यक्त केले, त्याप्रसंगी
शिक्षक वृंद गुलाब पाटील, राजेंद्र पाटील, भरत पाटील, वसंतराव चौधरी, संगिता पाटील, रजनी पाटील, जोती मोरे, तसेच अंगणवाडी सेविका द्वारका शेवरे, मदतनिस वैशाली पाटील,या सर्वांच्या उपस्थितीत प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रम यशस्वी केला