शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तिघा पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्याने विरोधकांची सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीवर जोरदार टीका सुरु असतांना भाजपचे मित्र पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील राज्य सरकारवर नापास सरकार म्हणून टीकास्त्र सोडले असून याबाबत त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट केले आहे.
मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे की, “महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीला 100 पैकी किती गुण द्याल असा जनतेला प्रश्न विचारला तर जनता केवळ 30 गुण देऊन महाविकास आघाडी सरकारला नापास सरकार ठरविल.”
राज्य सरकारच्या पूर्तीवर भाजपसह इतर विरोधी पक्षांनी जोरदार टीका करत हल्लाबोल केला आहे. यामुळे राज्यात सक्षम विरोधी पक्ष असल्याचं चित्र दिसत आहे.