राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं डिसेंबर पर्यंत पोलीस भरती घेऊ असं जाहिर केलं होत.मात्र अद्याप पोलीस भरती प्रक्रिया संदर्भात कुठलीच प्रक्रिया होतांना दिसत नसल्याचा राज्यसरकारवर महाराष्ट्र भाजपनं ठपका ठेवत आपल्या ट्विटर अकाउंट वरून तसं ट्विट केलं आहे.
महाराष्ट्र भाजपनं म्हटलं आहे की,राज्यातील तरुणांसाठी डिसेंबरपर्यंत भरती घेऊ म्हणणारे आता डिसेंबर आला तरी अद्याप कोणतीच प्रक्रिया पूर्ण नाही ! सर्वच गोष्टी अर्धवट करून सोडून टाकण्याची सवय लागलेल्या सरकारला पोलीस भरतीबाबत पण तसंच करण्याची इच्छा दिसते.
महाविकास आघाडीच्या सरकारला वर्षपूर्ती झाल्याने वर्षपूर्ती निमित्त साधून भाजपनं राज्य सरकार वर्षभरात कसं फेल ठरलं याबाबत अनेक मुद्यांवर सरकारला जाब विचारतांना दिसत आहे तर भाजपा नेते चहू बाजूनं सरकारवर टीकास्त्र करून गोचित पकडण्याचा प्रयत्न करीत आहे.