जळगाव (दि. 28) जागतिक संगणक सुरक्षा दिवसानिमित्त रविवार 29 नोव्हेबर रोजी सकाळी 11 वाजता तज्ज्ञांच्या ऑनलाईन संवाद कार्यक्रमाचे आयोजन ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभागातर्फे होत आहे.
आज संगणक, लॅपटॉप, मोबाईल सारख्या नवतंत्रज्ञानाच्या साधनाद्वारे बहुतांश व्यवहार होत आहे. शासन, प्रशासन, संस्था आणि वैयक्तिकरित्या या साधनांचा वापर वाढला आहे. नव्हे त्यावर अवलंबित्वच जणू सर्वांनी स्विकारलेले आहे, अशा वेळेस या साधनांच्या सुरक्षेचा प्रश्न सर्वांना निर्माण होतो. या प्रश्नांवर मार्गदर्शन करणारा संवाद कार्यक्रम ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभाग उत्तर महाराष्ट्र सेवाकेंद्र, जळगावने केलेले आहे.
या ऑनलाईन संवाद कार्यक्रमात संगणक, लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी या क्षेत्रातील अभ्यासक दिपक वडनेरे इंदू कॉम्प्युटर, समाधान पाटील कबचौउमवितील संगणक तज्ज्ञ, योगेश निकम मोबाईल तज्ज्ञ आणि डॉ. सोमनाथ वडनेरे सोशल मीडिया तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
रविवार 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 12.30 दरम्यान सदरहू कार्यक्रम युट्यूबवर ऑनलाईन प्रसारित केला जाणार आहे. त्यासाठी https://www.youtube.com/c/bkjalgaonsubzone ही लिंक असणार आहे. ज्या नागरिकांना प्रत्यक्ष संवादात सहभाग नोंदवून तज्ज्ञांना प्रश्न विचारायचे असतील त्यांनी 9850693705 या मोबाईल क्रमांकावर झुम लिंक व पासवर्डसाठी एसएमएस अथवा व्हॉटसअॅप मॅसेज करावा असे आवाहन ब्रह्माकुमारीज् मीडिया समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे हे करतात.