पंढरपूर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे.
राष्ट्रवादीसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. भारत भालके यांनी विधानसभेवर निवडून जाण्याची हॅट्ट्रिक केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून आमदार भारतनाना भालके यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली असून भारतनाना यांच्या निधनाने पंढरपूर तालुक्याचे मोठे नुकसान तर झाले आहेच, पण आम्ही देखील एक अत्यंत महत्वाचा सहकारी गमावला असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या प्राकृतित सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र, त्यात यश आले नाही आणि शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भालके यांनी अखेरचा श्वास घेतला.