चाळीसगाव, (प्रतिनिधी) – शहीद जवान यश दिगंबर देशमुख यांचे मूळगाव पिंपळगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांनी भेट देत शहीद जवान यांच्या कुटुंबाचे व ग्रामस्थांचे सांत्वन केले.
यावेळी शहीद वीर जवाना यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासाठीच्या जागेची पाहणी करत नियोजनासंदर्भात चाळीसगाव भागाचे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्यासोबत ग्रामस्थांशी चर्चा केली.