पाचोरा, (प्रतिनिधी)- पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित , श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे आज संविधान दिन साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारताचे संविधान पुस्तकाचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संविधान दिनानिमित्त पर्यवेक्षक श्री अजय अहिरे यांनी संविधानाचे वाचन केले.
याप्रसंगी मुख्याध्यापक श्री सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका सौ प्रमिला वाघ, कार्यालय प्रमुख अजय सिनकर ,पर्यवेक्षक श्री आर. एल.पाटील व श्री. एन. आर. पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू उपस्थित होते.