एरंडोल, (प्रतिनिधी)- येथे डॉ प्रतापराव दिघावकर विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी परिक्षेत्रातील अवैध धंदे यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पथकाची नेमणूक केलेल्या पथकाने 25 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा रात्री एरंडोल गावानजीक असलेल्या शिवारात महामार्ग क्रमांक सहा जवळ हॉटेल शेरे पंजाब च्या मागील बाजूस असलेल्या वंजारी वाट रस्त्याचे बाजूला असलेल्या बापू चौधरी यांचे लिंबूच्या शेतात जमिनीवर बसून 52 पत्त्याच्या कँट मधील अंकांवर व चित्रांवर पैसे लावून झन्ना मन्ना नावाच्या जुगाराच्या खेळ खेळताना जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला असता तेथे दहा लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
1 स्वप्निल मुरलीधर पाटील 39 रा बोरगाव,2
मच्छिंद्र नारायण महाजन 45 रा विखरण, 3 सुनील नाना पाटील 25 रा खडके,4 रफीकखान याकूबखान 22 रा एरंडोल, 5 पंढरी खुशाल पाटील 38 रा खडके खुर्द,6 शांताराम राजाराम महाजन 38 रा एरंडोल,7 अमित लक्ष्मण सिंग परदेशी 43 रा एरंडोल 8 गुलाब महादू पाटील 40 रा खडके खुर्द,9 सिद्धार्थ हिंमतसिंग परदेशी 28 रा एरंडोल,10 राजेश मोतीराम पाटील 40 रा रोटवद यांना जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आले यांचेकडून सुमारे 1 लाख 5 हजार 260 रुपये रोख व 2 लाख 75 हजार रुपये किमतीच्या 10 दुचाकी वाहने व 3 हजार 50 जुगाराचे साधन असे एकूण 3 लाख 83 हजार 310 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याबाबत पोलीस स्थानकात भाग-6 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ)सह भादवी कलम 188,268,269 प्रमाणे गुन्हा करण्यात आला असून सदर ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील एपीआय सचिन जाधव, पीएसआय संदीप जाधव, हवालदार नितीन सपकाळ, उमाकांत खापरे, विश्वेश हजारे, दीपक ठाकूर, अमोल भामरे, सुरेश टोंगरे या पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली असून पुढील तपासएरंडोल पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली राजू पाटील विकास देशमुख हे पुढील तपास करीत आहे.दरम्यान शहरात गांधीपुरा भागातील अनजानी नदीच्या पात्रालगत तसेच म्हसावद नाका परीसर,आठवडे बाजार परिसरात मोबाईलवर सट्टा सुरु असून त्यात दररोज हजारो रुपयांची उलाढाल होत आहे.मोबाईलवर सट्टा घेणा-या चालकांविरुद्ध देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.